हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत त्यामुळे त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता नवाब मलिक यांनी सोमय्या यांच्यावर पलटवार करत जोरदार प्रत्यतूर दिले आहे. मी कोणत्याही ईडी कार्यालयात जाण्यास तयार आहे असे नवाब मलिक म्हणाले. किरीट सोमय्यांना ईडीचे प्रवक्ते म्हणून घोषित करा असा टोला नवाब मलिक यांनी लगावला
काही दिवसांपासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना बातम्या पेरण्यात येत आहेत कि नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे. त्यांना मी येव्हडच सांगतो कि उगीच बदनामी करू नका, काही असेल तर प्रेस नोट काढा. फक्त भाजपच्या अजेंड्या वर आम्हाला बदनाम करण्याचे काम इडी ने बंद करावे असे नवाब मलिक म्हणाले
ज्याप्रकारे भाजपचे किरीट सोमय्या सांगतात की, नवाब मलिक यांना अटक होणार आहे. सोमय्या यांनी आपण ईडीचे प्रवक्ते झालो याचे अपॉइंटमेंट लेटर घ्यावे कारण ईडी ला पण एका चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. मी तर ईडीच्या लोकांची रोज वाट बघतोय, ईडी आली तर त्यांचे मी स्वागतच करेन असेही नवाब मलिक म्हणाले
वक्फ बोर्डाच्या कुठल्याही कार्यालायात छापेमारी झालेली नाही, तरीही तुम्ही अशा प्रकारच्या बातम्य पेरत असाल तर याची रीतसर माहिती द्या असे आव्हान त्यांनी ईडीला दिले. तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी मी हडपलेली नसून या प्रकरणी पुण्यातील भाजपच्याच दोन नेत्यांना अटक होईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला