देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होतंय ; नवाब मलिकांचा हल्लाबोल

malik fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात खडाजंगी सुरू आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाही आणि राज्यसरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, मात्र गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज दिले. आत्ता जनता प्रश्न निर्माण करु लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.