फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात; मलिकांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना भाजपचा पोपट अस म्हणल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांना राष्ट्रवादीचा पोपट अस म्हणत प्रत्युत्तर दिले, दरम्यान पोपटाचा धंदा माझा नाही असे म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर पलटवार केला आहे.

पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही; असं म्हणत नवाब मलिक यांनी नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.

100 पेक्षा जास्त लोकांना 26 फर्जी केसेसमध्ये एनसीबीनं अडकवलं आहे, हे अधिकारी भ्रष्टाचार करून लोकांना अडकवत असतील आणि हजारो कोटींची खंडणी वसूल करत असतील तर माझं काम आहे, त्यांना थांबवणं, आणि मी ते कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत नेईल असेही मलिक यांनी म्हंटल.