Wednesday, February 8, 2023

सुरक्षा दिली म्हणजे पाळत नव्हे; नवाब मलिकांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक म्हणाले, नाना पटोले यांचे आरोप हे माहिती अभावी आहेत. एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असो वा आंदोलन, ती माहिती संकलित करणे हे गृहखात्याचे काम असत. जर नाना पटोले यांना याबाबत अधिक माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अशा माजी मुख्यमंत्र्यांना विचारावे असेही मलिक यांनी म्हंटल.

- Advertisement -

जर त्यांना वाटत असेल की त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तस पत्र त्यांनी गृहखात्याला पाठवावे असा सल्ला नवाब मलिक यांनी दिला. सुरक्षा दिली याचा अर्थ पाळत ठेवली असा नाही असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आशिष शेलार यांनी पवारांवर टीका करताना म्हंटल होत की चोर की दाढी मे तिनका…यावरूनही मलिक यांनी निशाणा साधला. तो दाढी वाला चोर कोण याचं नावही आशिष शेलार यांनी सांगावे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.