हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत दमदार विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता आपले पुढील लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हंटल होत. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर पलटवार केला आहे. राणेंच विधान म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असे म्हणण्यासारख आहे अशी टीका त्यांनी केली.
नवाब मलिक म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २५ मते ५० मते असतात. अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे. अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसेच नारायण राणे हे अजित पवार कोण असं विचारताहेत. त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गजर नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते-
सिधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीनंतर राणेंनी आपलं पुढच लक्ष्य महाराष्ट्र सरकार असेल अस म्हणत डरकाळी फोडली होती. राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज असून राज्यातील जनतेच्या सुखासाठी केंद्रप्रमाणे राज्यात भाजपच सरकार हवं आणि त्यासाठी आता आमचं पुढच लक्ष हे महाराष्ट्र सरकार हेच असेल असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.