ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री; मलिकांचा दानवेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 15 ऑगस्ट पासून ज्यांनी कोरोनाचे 2 डोस घेतले आहेत त्यांना राज्य सरकार कडून लोकल प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करायला हवी होती अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिले.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, हे देशातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला माहीत आहे. ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत, ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा टोला मलिक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

यापूर्वी राऊतांनी लगावला टोला-

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही रावसाहेब दानवेंवर पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

Leave a Comment