सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही.
शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आणि सातारच्या राजकारणाचे समीकरणच बदलून गेले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा आता भाजपमय झाल्याचे चित्र निवडणुकीच्या आधी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर असताना साताऱ्यात आले आसता त्यांनी उदयनराजे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मला कबुल आहे की जयंतरावांचा यांचा सल्ला मी ऐकला नाही. केवळ या गादीचा अभिमान आहे म्हणुन मी दुर्लक्ष केलं असे म्हणून शरद पवार यांनी दोन्ही राज्यांना आपण कसे पाठीशी घालून जपले याचा साक्षात्कार उपस्थित कार्यकर्त्यांना करून दिला. उद्याच्या २१ तारखेला मतदान आहे. आसपासच्या भागात एक ही माणूस सोडू नका प्रत्येकाला भेटून त्याच्यापर्यंत घड्याळ पोहोचवा असा आदेशही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.