हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत खडाजंगी होत असते. इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे, तर राज्य सरकारने कर कमी केले तर पेट्रोल स्वस्त होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशीच मागणी भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी केली. त्यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५० टक्क्यांनी वाढला आहे. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असे असताना या नेत्यांचे गणित कळत नाही
राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर आहे. pic.twitter.com/0ThZx3AmtL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 31, 2021
असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी ₹ ची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे असा सल्लाही रोहित पवारांनी दिला.
असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी ₹ ची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 31, 2021
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.