हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. आर्थिक समस्येनं ग्रासलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची मागणी होत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
शेतकऱ्यांना मदतीचा मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर केंद्रानं राज्याची देणी द्यावी, असं राज्य सरकारकडून सांगितलं जातं आहे. याच वादात रोहित पवार यांनी उडी घेतली असून, त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे…
आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच,
पणकेंद्रानेही #GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी ₹ तातडीने द्यावेत.
अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 20, 2020
“दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे… तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल. राज्य सरकार ती घेतयंच, पण केंद्रानेही जीएसटीचे राज्याचे थकीत २८ हजार कोटी रूपये तातडीने द्यावेत. अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’