हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगर पंचायतीच्या 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागा जिंकत भाजपच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हंटल की, रोहित पवार हे पवार कुटुंबातील असल्यामुळे निवडणुकीत त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला असा आरोप त्यांनी केला. त्यांनतर रोहित पवार यांनीही दरेकरांना चोख प्रत्युत्तर दिले.
माननीय दरेकर साहेब मला आपल्याला फक्त आठवण करुन द्यायचीय की, ‘निवडणुकीत आश्वासन देऊन नंतर तो चुनावी जुमला होता’, असं म्हणणं ही भाजपाची सवय आहे… आणि ‘दिलेला शब्द पाळणं’, ही पवार कुटुंबाची सवय आहे! असे रोहित पवार यांनी म्हंटल.
कर्जतचा विजय हा 'मी पुन्हा येईल' स्टाईलचा नाही तर मायबाप कर्जतकर जनतेच्या विश्वासाचा आहे.याबाबत जनतेचे आभार! पण वर्षानुवर्षे उपेक्षित असलेल्या ‘कर्जत-जामखेड’ मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाची आपल्यासारख्या मोठ्या नेत्याने दखल घेतली,याबाबत आपलेही आभारच मानायला हवेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2022
कर्जतचा विजय हा ‘मी पुन्हा येईल’ स्टाईलचा नाही तर मायबाप कर्जतकर जनतेच्या विश्वासाचा आहे.याबाबत जनतेचे आभार! पण वर्षानुवर्षे उपेक्षित असलेल्या ‘कर्जत-जामखेड’ मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाची आपल्यासारख्या मोठ्या नेत्याने दखल घेतली,याबाबत आपलेही आभारच मानायला हवेत! असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला.