राष्ट्रवादी हा हुशार पक्ष, महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली; चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर महाविकास आघाडीला 66 जागा मिळालेल्या आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात हुशार पक्ष निघाला आहे. मुख्यमंत्री पद दुसऱ्याकडे देऊन महत्वाची खाती मात्र स्वतःकडे ठेवली, अशी टीका पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसवर केली.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल नगरपंचायतीच्या निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीत भाजपलाही चांगले मत मिळाले. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उमेदवार निवडून आले. नेहमीप्रमाणे शिवसेना ही पिछाडीवर गेली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष मात्र हुशार निघाला आहे. कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन करताच राष्ट्रवादि काँग्रेसने महत्वाची खाती स्वतःकडे घेतली आहेत. आणि मुख्यमंत्री पद मात्र शिवसेनेकडे दिले आहे.

काल चंद्रकांत पाटील यांनी “भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं. अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असे आव्हान महाविकास आघाडी सरकारला होते.