लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका हाताने बसचे स्टेअरिंग सांभाळताना आणि दुसऱ्या हाताने छत्री धरून बसलेला दिसत आहे. त्यामुळे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक वेगवेगळया कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओत काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बस ड्रायव्हरच्या या व्हिडिओ गडचिरोली येथील आहे. या व्हिडिओमध्ये बस ड्रायव्हर एका हाताने बस चालवताना आणि दुसऱ्या हाताने छत्री धरून बसलेला दिसत आहे. तर बाहेर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे त्याचे पाणी छतावरून त्याच्या अंगावर पडताना दिसत आहे. अशी स्थिती निर्माण झाली असताना देखील तो बस चालवत आहे. याच व्हिडिओमुळे सध्या महामंडळाच्या एसटीची दुर्दशा काय झाली आहे हे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

रोहित पवारांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी या बस ड्रायव्हरचा व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, ”भारत चांद पे और जनता गड्ढों में” असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, “राज्यभरात सामान्य प्रवाशाची लाल परी सरकारच्या दुर्लक्षामुळे जलपरी झालीये. हे ‘सामान्यांचं सरकार’ आहे असं भासणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं आणि seriousness नसल्याचंच यातून सिद्ध होतं. आता मविआ आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना ही गळणारी बस दिसेल काय?” असा सवाल रोहीत पवार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीच रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून महामंडळाच्या एका बसचे छत उडतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी देखील त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मुख्य म्हणजे, सतत समोर येणाऱ्या अशा व्हिडिओमुळे महामंडळाच्या एसटींची दुर्दशा आणि प्रवाशांचे होणारे हाल दिसून येत आहेत. मात्र अद्याप सरकारी यावर कोणताही मार्ग काढताना दिसत नाहीये.