हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये नेहमीच विविध मुद्द्यांवर खडाजंगी होत असते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा असा टोला चाकणकर यांनी लगावला आहे.
चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे, की त्यांनी चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा”, असं चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.@ChDadaPatil @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 20, 2021
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावल्यामुळे सरकारचा भार हलका होईल, असं रुपाली चाकणकर या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत. “केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देत नाही. निदान त्यांच्यावरील (चंद्रकांत पाटील) करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल”, असं यात म्हटलं आहे.