अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन; रुपाली चाकणकरांचा टोला

0
94
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लागवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल कि, वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या-

राज्यातील महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत सरकार वर निशाणा साधला होता. कोणी मला सांगेल का?, आज वसूली चालू है या बंद?’ असा  खोचक सवाल करत त्यांनी महाराष्ट्र बंदला आपला विरोध दर्शवला आहे. तसेच महाराष्ट्र बंद नही है असा हॅशटॅग त्यांनी वापरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here