पवार नाव ऐकले की पडळकरांना लईच झटके येतात; राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

0
43
pawar padalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे जेष्ठ असले तरी श्रेष्ठ नाहीत, देवेंद्र फडणवीस हे अशा १०-२० पवारांना खिशात घेऊन फिरतात अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवार नाव ऐकले की पडलकरांना लईच झटके येतात असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

काय गोपी भाऊ उचलली जीभ लावली टाळ्याला. बिरोबा देवा सद्बुद्धी दे रे आमच्या गोपी भाऊला. पवार नाव ऐकून लईच झटके येतात. असो भाजप वाल्यांची बरळन्याची सवय महाराष्ट्र जाणते. आणि हो 10 ,20 तर सोडाच , एकच शरद पवार साहेब तुमच्या भाजपला ,फडणवीसला पुरून उरले आहेत,हे नीट ध्यानात ठेवा. गोपी भाऊ पडळकर झटके कमी येतील. विसरलात का पंतप्रधान मोदी साहेब स्वतःम्हणाले होते, मी शरद पवार साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो.त्यामुळे जरा विचारपूर्वक बोला भाऊ असे रुपाली पाटील यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/947239435316421/posts/7378954962144804/

पडळकर नेमकं काय म्हणाले-

शरद पवार हे जेष्ठ असले तरी श्रेष्ठ नाहीत. माझ्यापेक्षा कोणीही पुढे जाऊ नये असेच त्याना वाटत. गद्दारीपणा, लबाडीपणा, विश्वास घातकी पणा, हाच त्यांचा विषय आहे. पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस हे जास्त प्रघलभ नेतृत्त्व असून फडणवीस हे अशा १०-२० पवारांना खिशात घेऊन फिरतात अशी टीका पडळकरांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here