उद्धव ठाकरेंनी वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले; पवारांकडून शाबासकी

0
24
Sharad pawar Uddhav thakarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, प्रेश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली आहे. प्रेश्नम या संस्थेने देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांची कामगिरी 49 टक्के मतदारांनी कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here