पुणे प्रतिनिधी | चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी का सोडली या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांच्या समक्ष येण्यास सुरुवात झाली आहे. याला दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दुजोरा दिला आहे. चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पतीवर असणाऱ्या केस बद्दल मला सांगितले. त्यानंतर त्या म्हणाल्या कि मला असाह्य असा त्रास होऊ लागला आहे त्यामुळे मला पक्ष सोडण्याची परवानगी द्या असे चित्रा वाघ या शरद पवार यांना म्हणाल्या याबद्दल शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
चित्रा वाघ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नाही तरी देखील त्या भाजपमध्ये सामील होणार असे बोलले जाते आहे. त्यांच्या पतीला ४ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. या प्रकरणातून नवऱ्याची सुखरूप सुटका व्हावी म्हणून चित्रा वाघ या राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये जाणार आहेत असे बोलले जाते आहे.
चित्रा वाघ आपल्या जवळ आल्या त्यांनी आपल्याला सांगितले की माझ्या पतीवर असणाऱ्या केसचा तगादा लावला जात आहे. मला हा त्रास सहन होण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे तुम्ही मला पक्ष सोडण्याची मुभा द्या असे असे चित्रा वाघ शरद पवार यांना म्हणाल्या नंतर शरद पवार यांनी त्यांना स्वतः च्या विवेकाने निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.