शरद पवारांचे राज ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर; प्रत्येक मुद्द्यावरून सुनावले खडेबोल

sharad pawar raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील उत्तरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टीका केल्यानंतर आज शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढले असून राज ठाकरेंना कडक शब्दांत खडेबोल सुनावले आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा दिली नाही. राज ठाकरेंच्या सभेला लोक जमतात. ते नकला करतात, शिवराळ भाषा वापरतात, त्यामुळे लोकांची करमणूक होते, म्हणून लोक त्यांच्या सभेला जातात असा चिमटा शरद पवारांनी काढला

शरद पवार म्हणाले, राज ठाकरेंनी माझ्यावर आरोप केला की मी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, त्यांना मी सांगू इच्छितो की, दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये होतो. माझं भाषण मागवलं तर शिवाजी महाराजांचं योगदान यावर २५ मिनिटांचं भाषण होतं,” असं शरद पवार म्हणालेत. या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्र सविस्तरपणे कोणी लिहिलं असेल तर फुलेंनी लिहिलं आहे. त्यामुळे फुले, आंबेडकर शाहुंचा उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/708934226905854/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C

छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा आदर्श घेऊन कशाप्रकारे करावा हे या तिघांनी मांडलं आहे, असं पवार म्हणालेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणाचा आक्षेप मी घेतला याबाबत मला अभिमानच आहे कारण माझं अस मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवण्यामध्ये त्यांच्या माता जिजाऊंचा वाटा होता मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी दादाजी कोंडदेव यांचा उल्लेख केला. त्यांच्या या लिखाणाला मी उघडपणे विरोध केला त्याचा मला अभिमान आहे.

पवार पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. खर तर माझा तेव्हा काँग्रेसला किंवा वैयक्तिक सोनिया गांधी यांना विरोध नव्हता. मात्र त्यांच्या पंतप्रधान पदाला विरोध होता. परंतु एकदा त्यांनी जाहीर केलं की त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा नाही तेव्हा आपल्यातील वादाचा प्रश्नच मिटला असे शरद पवार यांनी म्हंटल.

राज ठाकरे म्हणाले मी नास्तिक आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी कधीही निवडणुकीत देवधर्म आणत नाही. मी एकाच मंदिरात जातो. हवं तर तुम्ही बारामती मधील लोकांना विचारा.. पण मी त्याचा गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे काही आदर्श आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे माझे आदर्श आहेत त्याचं लिखाण वाचलं तर त्याचं सविस्तर मार्गदर्शन होईल. देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रबोधनकारांनी टीका केली. आम्ही प्रबोधनकारांचं लिखाण वाचतो , कुटुंबातील लोक वाचत असतील असं नसाव त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.