हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली.
सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून नोटिसा देण्यात आल्या आहे. याआधी राज्यात असा प्रकार कधीच घडला नाही. ईडीच्या आड भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे’, अशी टीका शरद पवार यांनी केली. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्यच नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी हे सरकार कधी पडणार, यासाठी वेगवेगळ्या तारखा देत आहे. आधी त्यांनी दोन महिन्यांची मुदत दिली होती. नंतर सहा महिने सांगितले होते. पण सहा महिन्यात महाविकास आघाडी सरकार काही कोसळले नाही. पण त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी नोव्हेंबरमध्ये सरकार पडणार असं सांगितले. उलट ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. ठाकरे सरकार हे स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’