हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. रोज नवनवीन रुग्णांची भर पडत असून डॉक्टर आणि प्रशासनाची तारांबळ उडते आहे. पण, संकटाच्या या काळातही संपूर्ण जगातील अनेक प्रशासनं आणि आरोग्य संघटना या विषाणूवर मात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला जवळपास संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्याखाली आहे.
ही सर्व परिस्थिती आणि कोरोनाविरोधात सुरु असणारा लढा नजरेत घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला सर्वांना दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेला एक व्हिडिओ शेअर करत कोरोनापासून दूर रहायचं असे तर, नेमकं काय कराव आणि कसं करावं या प्रश्नांची उत्तरं त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहेत.
देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा.#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी pic.twitter.com/RBTX39x7ZJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2020
1) वारंवार हात स्वच्छ धुवा.
2) डोळे, तोंड आणि नाकाला स्पर्श करणं टाळा.
3) खोकताना कोपराच्या किंवा रुमालाच्या सहाय्यानं तोंड, नाक झाका.
4) गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
5) साधा सर्दी ताप असला तरीही घराबाहेर जाणं टाळा.
6) सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, सर्वप्रथम दूरध्वनीच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
7) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष ठेवा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’