हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच झालेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या भास्कर जाधव यांनी पुन्हा हे पद स्विकारन्याची तयारी दर्शवली पण वनखाते काँग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षपद नको अशी भूमिका त्यांनी घेतली. मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे असेही ते म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं
आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव -बाळासाहेब थोरात
दरम्यान, आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भास्कर जाधव यांच्या विधानातील हवाच काढली. तसेच आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत अस म्हणत विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.