आता तरी चंद्रकांत पाटलांना आणि राणेंना चांगली झोप लागेल ; शरद पवारांचा जोरदार टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार कडून भाजपच्या काही दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा सुरक्षा पुरवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे.

राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवणे हे अत्यंत चुकीचेच आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. या निर्णयामुळे ज्यांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने कमी केली होती, त्या नेत्यांना (माजी मुख्यमंत्री नारायण राणे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील) चांगली झोप तरी लागेल असा टोला शरद पवारांनी लगावला.

पवार म्हणाले, ज्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, तो राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे घेतलेला निर्णय होता. असे असताना केंद्राने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे हे जरा गंमतीशीरच आहे. मलाही त्याचे आश्चर्य वाटले. त्या संबंधित नेत्यांनी त्याची मागणी केली आसेल. आता सुरक्षा व्यवस्था मिळाल्याने चांगली झोप लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like