ममतांना मिळणार पवारांची पॉवर!!! ; पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना एकत्र करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली असून तृणमूल काँग्रेस आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल मध्येही आमदाराना फोडून भाजप प्रवेश दिला जात आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली असून गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये शरद पवार जातील व विरोधकांना एकत्र करण्याचे काम करतील.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये अनेक सभा घेत आहेत. भाजपा केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम करीत आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली. तसेच गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्येही जातील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment