मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांच्या तब्बेतीबाबत अनेकांनी ट्विटरच्या माध्यामातून काळजी व्यक्त केली होती. पवार यांच्या प्रकृतीबाबत राजकिय वर्तुळात चर्चा सुरु होती. मात्र आता शरद पवार यांनी याबाबत स्वत: ट्विट केले आहे. सदिच्छा व्यक्त केलेल्यांचे पवार यांनी आभार मानले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार! @RajThackeray
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ हर्षवर्धन, लता मंगेशकर आदींचे आभार मानले आहेत. आदींनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार असं म्हणत पवार यांनी ट्विट केले आहे.
Received a phone call from Shri @drharshvardhan ji to check about my health. Appreciate him checking on my health and well-being.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
Received a phone call from Shri @drharshvardhan ji to check about my health. Appreciate him checking on my health and well-being.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
दरम्यान, पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group