पवार साहेब लवकर बरे व्हा ! तुम्ही आधारवड आहात; भाजप नेत्याचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान भाजप नेत्यांनी मात्र पवारांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत शरद पवारांच्या तब्बेती साठी ईश्वराकडे प्रार्थना केली.

पवार साहेब लवकर बरे व्हा ! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे ‘मार्गदर्शक’ आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ‘आधारवड’ आहात तुम्ही. Get well soon साहेब काळजी घ्या! अस ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील पवार साहेबांसाठी प्रार्थना केली. बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार आहे. मी मुंबादेवी, महालक्ष्मीचरणी आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की पवार साहेबांना लवकर बरं होऊ देत. ते लवकरच पुन्हा बरे होतील आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सक्रीय होतील” असे त्या म्हणाल्या.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like