शरद पवार कोरोना लस घेण्यासाठी जे जे रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar covid19 vaccine) हे सुद्धा कोरोना लस टोचून घेणार आहेत. दरम्यान आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस टोचून घेतली. त्यानंतर आज शरद पवार हे मुंबईतील जे जे रुग्णालयात (Mumbai J J Hospital) लस घेण्यासाठी दाखल झाले.

त्यांच्यासोबत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित आहेत. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी पोहचले आहेत. पवार यांची सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment