हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेला पंतप्रधान कोण या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 90% मत मिळाली. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीतील समोर आलेल्या कलावरून राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. अस ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.
अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. pic.twitter.com/GSlGQPOwmC
— NCP (@NCPspeaks) May 22, 2021
काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा! असा टोला देखील राष्ट्रवादीने लगावला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.