रामाच्या नावाने राजकारण करणारे हे भाजपचेच नेते, त्यांनीच जमिनी हडप केल्या ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्यावरून भाजपवर हल्लाबोल केला. आष्टीत मंदिर आणि मशिदीच्या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्याविरोधात राम खाडे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मलिक यांनी करीत जो भाजप प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन राजकारण करत आहे. त्याच भाजपचे नेते राज्यात प्रभू रामांच्या मंदिराच्या जमिनी हडपत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त म्हणाले की, मी सात देवस्थानाच्या बाबतीत राम खाडे यांनी तक्रार केली आहे. गृहखाते, महसूल खाते आणि ईडीकडेही या दहा प्रकारणाची तक्रार केली आहे. त्यात मच्छिंद्रनाथ मल्टि इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचाही सहभाग आहे. जो भाजप रामाच्या नावने राजकारण करतो त्या भाजपचे नेते प्रभू रामाच्या देवस्थानाची जागा हडपत आहेत. विठोबाची जागा हडपत आहे.

सात देवस्थानाची जागा हडप करून हजारो कोटी रुपयांची माया जमा करत आहेत. भाजपच्या माध्यमातून हे होत आहे. ईडी सारख्या संस्थेवर कोणीही अविश्वास दाखवत नाही. या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थानांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला. वक्फच्या जमिनीचा तपास सुरू आहे. इतर सात प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याची विनंती गृहखात्याला करणार आहे.

जमीन घोटाळ्याप्रकरणी आम्ही आतापर्यंत 11 एफआयआर दाखल केले आहेत. आष्टीत तर मशीद आणि दर्ग्याच्या जमिनी हडप केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. आष्टीत अधिकाऱ्यांनी सर्व्हिस इनाम जमिनीला मदत इनाम दाखवून हडप केली. खासगी नाव टाकून त्याचं प्लॉटिंग करून विकण्याचा त्यांचा डाव होता. आम्ही तक्रार दाखल केली आहे. आष्टीत दहा देव अस्थानाचा घोटाळा उघड केला आहे, असे मलिक यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment