पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; आर्यन खानच्या जामीन मंजूरीनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त,” असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

आर्यन खानच्या जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यन खानला तब्बल 26 दिवसानंतर जामीन मंजूर केला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान अटक प्रकरणात पहिल्यापासून आर्यनची बाजू घेतली आहे. एनसीबीच्यावतीने करण्यात येत असलेली कारवाई हि चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा आरोप मलिकांकडून केला जात होता. दरम्यान आज वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाच्यावतीने आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. आणि जामीनानंतर नवाब मलिक यांनी सूचक असे ट्विट करीत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.