आदी जीभ घसरलीय आता पाय घसरु देऊ नका; नवाब मालिकांचा चंद्रकांत पाटलांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. “ठीक आहे चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी, असे मलिक यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचा परिणाम चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यानंतर पाटलांनी शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला. त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूलिही दिली आहेत.

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेले पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून टीका होऊ लागली आहे.