आमच्याकडेही भाजप नेत्यांची यादी, ती दिल्यास ईडी काय कारवाई करणार?; जयंत पाटलांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात त्यांना अडकवून त्रास दिला जात आहे. या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्याकडेही भाजप नेत्यांची यादी आहे. ती ईडीला देऊ का? जर ती दिल्यास ईडी नेमकी काय कारवाई करेल ते सांगेल का? असा सवाल पाटलांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद सांडत भाजपला लक्ष केले. “महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी असलेल्या पक्षांतून भाजपमध्ये जे लोक गेले आहे. त्यांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? त्यांनाही आदींची भीती आहे. आमच्याकडेही अशा लोकांची यादी आहे. आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, जरा सांगाल का? असा सवाल पाटलांनी उपस्थित केला.

यावेळी ते पुढे म्हणाले की, “सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. बदनामीचे हे षडयंत्र जाणीवपूर्वक सुरू आहे. हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत. तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे.” जाणीवपूर्वक आघाडीतील मंत्र्याना अडकवण्याचे काम केले जात असल्याचे मंत्री पाटील शेवटी म्हणाले.