हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन मोदी सरकारवर चोहो बाजूनी टीका होऊ लागली आहे. शेतकऱ्यांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसात आता महाराष्ट्र राज्यात उमटत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे दिली असल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, ” 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये इतर मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आम्ही आवाहनही केले आहे.
लखीमपूरला जी शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची घटना घडली. त्याचा निषेध 11 तारखेला केला जाणार आहे. आज मंत्रिमंडळातही याबाबत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष देशातील शेतकऱ्यांविरोधात ज्या क्रुरतेने वागत आहे, देशात जागोजागी सुरु असलेली शेतकऱ्यांची आंदोलने चिरडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असल्याची टीकाही यावेळी पाटील यांनी केली आहे.