राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप सरकारला पाठिंबा; राजकीय घडामोडीने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड (Nagaland) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- NDPP सरकारला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा कट्टर विरोधक मानला जातो. मात्र नागालँड मध्ये राष्टवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्र्रवादी सोबतच अन्य विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला पाठिंबा दिल्यामुळे नागालँड मध्ये कोणी राजकीय विरोधकच राहिला नाही.

2 मार्चला नागालॅंड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये NDPP- भाजप युतीने एकूण ६० जागांपैकी ३७ जागा जिंकल्या. NDPP ला 25 आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागा जिंकल्या. याशिवाय NPP ला 5, एलजेपी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि आरपीआय (आठवले) यांना प्रत्येकी 2 जागा, जेडी (यू) एक आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत.

विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. त्यामुळे राष्टवादी काँग्रेस हा नागालँड मध्ये विरोधी पक्षच्या भूमिकेत असणार असं म्हणत जात होत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेच थेट भाजप- NDPP सरकारला पाठिंबा दिल्यामुळे चर्चाना उधाण आलं. सर्वच राजकीय पक्षांनी सत्ताधारी NDPP- भाजप युतीला पाठिंबा दिल्याने नागालँडमध्ये आणखी एक सर्वपक्षीय सरकार असेल. देशात 2015 आणि 2021 मध्ये सर्व पक्षीय सरकारे आली होती. शरद पवारानी आता भाजपला पाठिंबा दिल्यामुळे आगामी राजकारणात याचे काय पडसाद उमटतात हे पहायला हवं