हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचा 2 वर्षा पूर्वीचा ईडी नोटीस आल्यानंतरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दिल्लीच्या तख्ता पुढे महाराष्ट्र झुकत नाही अस म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवायांवरुन निशाणा साधत इशाराच दिला आहे.
सुडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस,” असं राष्ट्रवादीने ट्वीट करताना म्हटलं आहे.
सुडाच्या राजकारणाला मात देणारा, महाराष्ट्रातील घडामोडींना निर्णायक वळण देणारा, दिल्लीच्या तख्त़ासमोर महाराष्ट्र झुकत नाही, या इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हाच तो दिवस… @PawarSpeaks #ThisDayThatYear #ThisDayInHistory #sharadpawar pic.twitter.com/jQEgMPDT7c
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 27, 2021
2 वर्षांपूर्वी शरद पवारांना ईडीची नोटीस-
शरद पवारांना शिखर बँक प्रकरणी ईडीची नोटीस आली होती. दरम्यान, यानंतर पवार आक्रमक झाले होते. आपण स्वतः ईडी कार्यालयात जाऊन पाहुणचार घेणार आहे असे त्यांनी त्यावेळी म्हंटल होत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं होतं.