चंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड मधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.

तीन दिवस मतदानाला राहिलेले असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर शिवाजी पाटील यांनी एकला चलो रे चा नारा देत कुठल्याही नेत्याशिवाय गावागावांमध्ये पदयात्रा आणि प्रचारावर भर दिलाय. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळं निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here