सांगली प्रतिनिधी | निवडणुकीचे पडसाद अजूनही कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहेत. याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यास जबरदस्त मारहाण केली असल्याची घटना आगर मध्ये घडली आहे. याबाबत कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील गांधी मैदान येथे घडला. समीर गवळी याने या बाबत फिर्याद दिली आहे.
सुभाष जाधव, ऋषिकेश कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह ४ ते ५ जणंविरोधात ३०७ सह विविध कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज जाधव व ऋषिकेश डहाळे या दोघाना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी गवळी याचा पुतण्या आदित्य संजय गवळी हा गांधी मैदान परिसरात थांबला असताना लोकसभा निवडणुकीत तू भाजपाचा प्रचार का केलास असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ताने सुरज जाधव याच्यासह ४ ते ५ जणांनी आदित्य याला लाकडी दांडक्यानी बेदम मारहाण करत डोक्यावर काचेच्या बाटल्या फोडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.