पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि वालचंदनगर याच ठिकाणी एसटी वाहतूक सुरु आहे. इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सर्वाना पूर्वीचेच नियम पाळावे लागणार आहेत. सर्वाना पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
अदयाप राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात ना आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांना पास काढावा लागणार आहे. तसेच पुण्यात यायचे असल्यास आणि पुण्याबाहेर जायचे असल्यास दोन्ही परिस्थितीत नागरिकांना परवानगी घेऊन पास काढणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना धोका उदभवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पाससाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यांची छाननी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले आहेत.
दरम्यान राज्यात एकूण संख्येच्या निम्मीच दुकाने सुरु राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहेत. प्रार्थना स्थळेही सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. खाजगी कार्यालये १०% क्षमतेने सुरु केली जाणार आहेत. पण यामुळे नागरिकांना कोरोनाचा धोका आणखी वाढू नये म्हणून वाहतुकीचे नियम तेच राहतील. गाड्यांमधील प्रवासी संख्या ही संचारबंदीमध्ये निश्चित करून दिलेलीच राहील, ही माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. संचारबंदीचे नियम शिथिल झाले असले तरी वाहतुकीच्या नियमांमध्ये फारसा बदल झालेला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.