हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yamaha RX 100 : Yamaha कंपनीच्या सर्वांत लोकप्रिय गाड्यांपैकी RX 100 ही आहे. सध्या या गाडीचे प्रोडक्शन बंद असले तरीही लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. 90 च्या दशकामध्ये तर या गाडीच्या लोकप्रियतेने कळसच गाठलेला होता. मात्र Yamaha RX100 चे प्रोडक्शन अचानक बंद केल्याच्या जवळपास तीन दशकांनंतर ही गाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आता ती पुन्हा लॉन्च करणार असल्याचे कंपनीकडून नुकतेच सूतोवाच दिले गेले आहे.
मात्र आता या मोटारसायकलमध्ये अनेक मोठे बदल दिसून येतील. तसेच प्रदूषणाच्या नवीन नियमांनुसार त्याचे इंजिनही पूर्णपणे बदलेले जाईल. मात्र आता ग्राहकांना असा प्रश्न पडतो आहे की, RX100 ही गाडी पूर्वीप्रमाणेच जोरदार असेल की इतर 100 सीसी बाईकप्रमाणे फक्त एक ऍव्हरेज बाईक ठरेल. हे लक्षात घ्या कि, एकेकाळी संपूर्ण आशियाई बाजारपेठेमध्ये Yamaha च्या नावाला खरी ओळख मिळवून देणारी ही मोटरसायकल बंद होण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. चला तर मग आज आपण या मोटरसायकलबाबत जाणून घेऊयात…
RX100 अचानक का बंद करण्यात आली ???
हे लक्षात घ्या कि, RX100 नंतर या गाडीचे पुढील व्हर्जन देखील लॉन्च केले गेले. ज्यापैकी RXZ आणि RX135 हे मॉडेल्स सर्वात लोकप्रिय ठरले. मात्र पुढे जाऊन या दोन्हीचे प्रोडक्शन देखील बंद करण्यात आले. RX100 बंद करण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र यामागील खरे कारण असे कि, गाडीचे टू स्ट्रोक इंजिन हे प्रदूषणाच्या मानदंडांची पूर्तता करत नव्हते ज्यामुळे 1996 मध्ये तिचे प्रोडक्शन बंद करण्यात आले. Yamaha RX 100
RX100 ही गाडी लोकप्रिय ठरण्यामागील कारण म्हणजे त्याचा डीसेंट राउंड हेडलाइट लुक, स्लीक बॉडी, हलके वजन आणि उत्तम पिकअप हे होते. तसेच RX100 ही त्या काळातील सर्वात कमी मायलेज असलेली मोटरसायकल देखील होती. त्याकाळी Hero या दुसऱ्या एका बाईक बनवणाऱ्या कंपनीकडे CD 100, CD 100 SS, Honda Sleek सारख्या मोटारसायकल्स होत्या ज्या चांगल्या मायलेज देत होत्या. मात्र त्या काळच्या टू स्ट्रोक इंजिन असलेल्या बाईकमध्ये, RX 100 चा पिकअप सर्वात जास्त होता. Yamaha RX 100
हे लक्षात घ्या कि, RX100 अजूनही भारतातील ड्रॅग रेसर्सची पहिली पसंती आहे. आजच्या काळातही या मोटारसायकलच्या सस्पेन्शनमध्ये किरकोळ बदल करून ड्रॅग रेसर्सकडून ही मोटरसायकल वापरली जाते. त्याचे हलके एल्युमिनियम इंजिन रेसर्सना वेगासह संतुलित स्थिती पुरवते. Yamaha RX 100
नवीन RX100 मध्ये काय बदल केले जातील ???
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान यामाहा इंडियाचे चेअरमन इशिन चिहाना यांनी सांगितले की,”कंपनी कडून RX100 पुन्हा लॉन्च करण्याचा विचार केला जातो आहे.” आता इंजिनच पूर्णपणे बदलले जाणार असल्याने जुन्या RX100 ला तसा अनुभव येणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हे लक्षात घ्या कि, आता यामध्ये टू स्ट्रोक ऐवजी 4 स्ट्रोक इंजिन दिले जाईल, मात्र यामुळे जुनी RX100 मोटरसायकल चालवण्याची मजाच निघून जाईल असे म्हंटले जात आहे. तसेच ही नवीन गाडी आजच्या काळ आणि नियमां नुसार तयार केली जाईल. Yamaha RX 100
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bikedekho.com/yamaha/yamaha-rx-100
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा