मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देणारा राष्ट्रवादी आमदार भाजपच्या वाटेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले होते, यामध्ये चिकटगावकर यांचा देखील समावेश होता. भाजप प्रवेशासाठी त्यांचे व्याही भाजप खासदार प्रतापराव पाटील चिकटगावकर आग्रही असल्याचं बोलले जात आहे. राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित सभेला भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अनुपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या . येत्या दोन दिवसांत भाऊसाहेब चिकटगावकर भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे .

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.