मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूग्ण आज मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 10 झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात महाराष्ट्रातला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी भागात एकूण सात रूग्ण आढळले होते. आता मुंबईत दोन रूग्ण आढळले आहेत अशी माहिती समोर आली आहे. भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या 23 आहे. त्यातले दहा रूग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन 25 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला आणि अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांता तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 315 जणांचा शोध घेण्यात आला आहे.
Two more cases of #Omicron variant of coronavirus, a 37-year-old South Africa returnee man & his 36-year-old US returnee friend, have been confirmed in Maharashtra, taking the total number of the cases to 10 in the state: Maharashtra Govt
— ANI (@ANI) December 6, 2021
काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात रुग्ण सापडले होते. यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान महाराष्ट्रात आता ओमीक्रोन रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.