चीनमध्ये पुन्हा सापडला ‘हा’ व्हायरस, साथ पसरण्याची वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सध्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलेला आहे. तसंच या साथी वरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश आटोकाट प्रयत्न देखील करत आहेत. अशातच आता या व्हायरसचा उगम चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. सध्याच्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नविन स्वाईन फ्लू २००९ मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे.

“हा नविन स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला गंभीररित्या आजारी देखील शकतो. जर कोरोनाच्या सध्याच्या साथीवेळी या नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो अधिकच गंभीर रुप धारण करेल,” असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलेलं आहे. या नव्या स्वाईन फ्लूला जी ४ असं नाव देण्यात आलेलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी २०११ ते २०१८ या कालावधीत बरंच संशोधन केलं. तसंच यादरम्यान १० राज्यांमधील सुमारे ३० हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

या तपासणीवरूनच चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सर्वांमध्ये जी ४ ला वेगळं करण्यात आलं आहे. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले त्यापैकी सर्वच डुकरांमध्ये जी ४ स्वाईन फ्लू असल्याचं दिसून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये २०१६ पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी ४ वर संशोधन सुरू केले. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच जबर धक्का बसला.
दरम्यान, जी ४ हा स्वाईन फ्लू मानवामध्ये वेगानं आणि गंभीरतेनं पसरू शकतो अशी माहिती या संशोधनातून पुढे आली. तसेच हा व्हायरस मानवी शरीरात देखील अधिक वेगाने पसरतो. आणि हा सीजनल फ्लू असल्यामुळे कोणालाही जी ४ या स्वाईन फ्लूपासून इम्युनिटी मिळणार नाही. सामान्य फ्लूपासून रक्षण होत असलं तरी जी ४ मात्र गंभीर रुप धारण करु शकतो, असंही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या १० पैकी एका कामगाराला जी ४ चा संसर्ग झाल्याचं दिसून आल्याचा दावा यावेळी वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडीजही टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी ४ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. २३० जणांवर केलेल्या चाचणीपैकी ४.४ टक्के लोकांना याचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानसांमध्ये आला असला तरी तो एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावरही संशोधन सुरू आहे.

जर हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला तर याचे परिणामही गंभीर होतील. तसंच ज्या लोकांचं काम या डुकरांशी निगडित आहे, अशा लोकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं चीनच्या वैज्ञानिकांनी आपल्या अहवालात नमूद केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment