औरंगाबाद – नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीपासून पुण्याला जाण्यासाठी मराठवाड्यातून एक नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. सुरवातीला आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावेल, नंतर तिला कायम करण्यात येईल. तसेच परभणी ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण दोन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
परभणी मनमाड दुहेरीकरण आ च्या पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद 98 किमीचे भूखंड सर्वेक्षणाच्या मंजुरीचे आदेश शुक्रवारी प्राप्त झाले आहेत. तसेच अंकाई येथे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर समांतर बायपास टाकण्यास मंजुरी मिळाल्याने आता मनमाड जाऊन परत येण्याचा 32 किमी चा फेरा वाचणार आहे.
नव्या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक –
ही रेल्वे दररोज सायंकाळच्या सुमारास नांदेड येथून निघून जालना येथे रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान, तर औरंगाबाद येथून अकराच्या दरम्यान निघून पुणे येथे सकाळी सहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच रेल्वे रात्री 9 च्या दरम्यान पुणे येथे निघून औरंगाबाद येथे सकाळी साडेचार ते पाच वाजे दरम्यान पोहोचेल. 1 व 2 जानेवारीला नांदेड येथून ही गाडी सुटेल. या गाडीला प्रथम, द्वितीय आणि तृतीय वातानुकुलीत श्रेणीचे तसेच स्लीपर क्लासचे डबे असणार आहेत.