परमबीर सिंग प्रकरणात नवा ट्विस्ट ! क्रिकेट बुकीचा जबाब, अटक होऊ नये म्हणून केली होती 10 कोटींची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांच्या प्रकरणामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता परमवीर सिंग यांच्यावर एक नवा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने गुन्हे अन्वेषण विभागाकडे नोंदवलेल्या जबाबानुसार एखाद्या मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल तर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना दहा कोटी रुपये दे असं परमवीर यांनी मला सांगितलं होतं असा जबाब सोनू जलान याने नोंदवला आहे.

दरम्यान या प्रकरणी परमवीर सिंग आणि प्रदीप शर्मा या दोघांनी देखील कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जलान यांना परमवीर सिंग प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार यांच्यावर वसुलीचे आरोप केले आहेत, याची सध्या सीआयडी मार्फत चौकशी केली जात आहे.

याबाबत पुढे अधिक माहित माहिती देताना जलान याने सांगितले की, मे 2018 मध्ये एका सट्टेबाजीच्या प्रकरणात ठाणे पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेल ने त्याला अटक केली होती. त्यानंतर आपल्याला तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे त्याने असं सांगितलं की, सिंग यांनी मला भारतातील सक्रिय क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्यांबाबत माहिती विचारली. तसेच मला कुटुंबातल्या सदस्यांसह एका मोठ्या प्रकरणात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेपासून बचाव करायचा असेल तर प्रदीप शर्मा यांना १० कोटी देण्यास सांगितल्याचा आरोप जालाननं जबाबात केला आहे.

 

 

 

Leave a Comment