‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात जात आहे. नासाच्या शाश्त्रज्ञानी याबाबत दावा केला असून संपूर्ण जगासाठी ही धोक्याची घंटा आहे.

न्यूयॉर्क मध्ये 29 – 30 सप्टेंबरच्या दरम्यान प्रचंड पावसाळी वादळ झाल्यामुळे तिथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हे एकीकडे सुरु असताना नासा (NASA) म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या वैज्ञानिकांनी न्यूयॉर्क शहर समुद्रात हळूहळू बुडणार असल्याचा दावा केला आहे. साऊथ कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी आणि न्यूजर्सीच्या रटगर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकाच्या एका ग्रुपने सायन्स एडव्हान्सेसमध्ये प्रकाशित केले आहे की, समुद्रकिनारी असलेले न्यूयॉर्क हे शहर आधुनिकतेच्या बाबतीत गगनभरारी घेत आहे. मात्र तिथे निर्माण होत असलेल्या पायाभूत सुविधा, मोठ- मोठ्या इमारती ह्यामुळे शहर जमिनीत जात असून हे शहर भविष्यात समुद्रात जाऊ शकते. शाश्त्रज्ञाच्या या दाव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1.6 मिलीमीटर वेगाने समुद्रात जात आहे शहर

नासाच्या ह्या अभ्यासात असे लक्षात आले की, समुद्रात शिरण्याची ही प्रक्रिया इंच इंच स्वरूपात होत आहे. एवढेच नाही तर दरवर्षीचा हा वेग 1.6 मिलीमीटर एवढा आहे. त्यामुळे नक्कीच ही चिंतेची गोष्ट आहे. न्यूयॉर्क शहर ग्लेशियरवर उभे आहे. ज्या ग्लेशियरवर ते उभे आहे तो आक्रसत चालला आहे. त्यामुळे भूस्खलनासारख्या घटना वाढल्या आहेत.

न्यूयॉर्क मध्ये सध्या पावसाचे वातावरण चांगलेच जोर धरत आहे. जोरदार पावसाळी वादळामुळे न्यूयॉर्क मध्ये पुराचे वातावरण निर्माण झाले. आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी तिथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ह्याबद्दल बोलताना गव्हर्न हॉचुल यांनी सांगितले की, ” आम्ही संपूर्ण प्रदेशात पाहत असलेल्या अतिवृष्टीमुळे न्यूयॉर्क शहर, लाँग आयलँड आणि हडसन व्हॅलीमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करत आहे”.