दादर रेल्वे स्टेशनवर TC चे सर्जिकल स्ट्राईक; 4,21,960 रुपयांची दंडात्मक वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण मुंबईच्या दादर रेल्वेस्टेशनवर (Dadar Railway Station) पश्चिम रेल्वे विभागाच्या ( Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या तब्बल 1647 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत दंडाच्या स्वरूपात 4,21,960 रुपये वसुल करण्यात आलेत.

दादर रेल्वे स्टेशन वर 30 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाद्वारे दिवसभर तिकीट तपासणीची ही मोहीम राबवण्यात आली. विशेष बाब म्हणजे यावेळी दादर रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या लोकांना चाप लावण्यासाठी एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल 195 रेल्वेमधील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची( TC )उपस्थिती होती. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दादर स्थानकात एंट्री मारल्याने तिकीट न काढलेल्या प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळालं.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या नुसार, दादर रेल्वे स्थानकात रबवण्यात आलेल्या ह्या महाकाय मोहिमेत तब्बल 1647 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना पकडण्यात आले. या सर्व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून दंड स्वरूपात रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम तब्बल 4,21,960 रुपये वसुल करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे तिकीट तपासणी ऑपेरेशन समजले जात आहे. पुढे अधिकारी असेही सांगतात की, “ही तपासणी मोहीम म्हणजे भारतीय रेल्वेवरील तिकीट नियमांचे पालन करण्याच्या महत्त्वाबद्दल प्रवाशांना कठोर स्मरणपत्र आहे.”