धक्कादायक ! कोरोनाच्या दास्तीने मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण अजूनसुद्धा कोरोनाची भीती कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील लोअर परेल परिसरात एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याचं नाव अजय कुमार आणि सुजा असे आहे. दोघेही आपल्या कुटुंबासह लोअर परेल परिसरातील भारत टेक्सटाईल मिल टॉवरमध्ये राहत होते. शुक्रवारी 23 जुलै रोजी या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. दोघांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

अजय कुमार आणि सुजा हे दोघेही केरळ येथील रहिवासी होते. या दोघांचे 10 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे दोघेही मुंबईत कामाला होते. अजयकुमार एका खासगी कंपनीत कामाला होता. तर सुजाही एका बँकेत काम करत होती. हे दोघेजण लग्न झाल्यानंतर लोअर परेलमध्ये राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी राहत्या घरात दोघांचे मृतदेह आढळून आले होते. अजयचा मृतदेह हा किचनमध्ये सापडला होता. तर पत्नी सुजाचा मृतदेह हा बाथरूममध्ये आढळून आला होता. दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने नायर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईट नोट सुद्धा आढळून आली होती.

अजय आणि सुजाला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरेसुद्धा झाले होते. पण त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. यामुळे त्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या सुसाईड नोटमध्ये कोरोनामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.