रेल्वेखाली उडी घेऊन नवविवाहीतेची आत्महत्या

0
51
suicide
suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या 21 वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर येथील गेट नंबर 54 येथे रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

जवाहर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता गणेश म्हस्के (21, रा. गारखेडा) असे मृताचे नाव आहे. या युवतीने सहा महिन्यांपूर्वी गणेश म्हस्के (23) त्याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. गणेश हा पत्नी आई-वडील आणि भावासोबत गारखेड्यातील काबरानगरमध्ये राहत होता. रविवारी रात्री दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. स्मिताने घर सोडले तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. काल सकाळी जवाहर नगर पोलिसांना रेल्वे समोर महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती परिसरातही पसरली स्मिताचे कुटुंबीयही तेथे गेले. तेव्हा मृताची ओळख पटली. रेल्वेच्या धडकेत सर्वत्र पसरलेले मासाचे तुकडे गोळा करून घाटी रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here