पाकिस्तानसाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे!! लष्करातही बंडाची आग; 6 लष्करी अधिकारी सरकार विरोधात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान मध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, जाळपोळ सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता तर पाकिस्तानी लष्कर सुद्धा बंडाळीच्या तयारीत आहेत. पाक लष्कराचे 6 वरिष्ठ अधिकारी हे पाक लष्करप्रमुख आणि पाकिस्तान सरकारच्या विरोधात गेले आहेत. खुद्द पाकिस्तानी लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्याने हा दावा केला आहे.

पाकिस्तानी सैन्याचे मेजर आदिल राजा यांनी ट्विट करत म्हणल आहे की, लष्कराचे सहा लेफ्टनंट जनरल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि सत्ताधारी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत. आसिफ गफूर, असीम मलिक, नौमन झकेरिया, साकिब मलिक, सलमान गनी आणि सरदार हसन अझहर अस या लष्कराची नावे आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील ४८ ते ७२ तास पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानी लष्कराचे 6 लेफ्टनंट जनरल पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पीएम शाहबाज सरकारच्या विरोधात एकत्र येऊन राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि ठरावाच्या प्रस्तावांना पाठिंबा देत आहे. याचा अर्थ पुढील 48 ते 72 तास पाकिस्तानच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान आता गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशात ठिकठिकाणी हिंसाचार, तोडफोड आणि जाळपोळ रोखण्यासाठी पाकिस्तानी लष्कराची तैनाती ज्या पद्धतीने वाढवली जात आहे, त्यावरूनही तसेच संकेत मिळत आहेत.

यातील अनेक लेफ्टनंट जनरल असे आहेत, ज्यांची नावेही पाकिस्तानचे लष्करप्रमुख होण्याच्या शर्यतीत सामील होती. पण अखेर असीम मुनीर हे पीएम शाहबाज यांची पहिली पसंती ठरले. यानंतर त्यांना लष्करप्रमुख बनवण्यात आले. पण आता असीम मुनीर यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणी वाढू शकतात.