नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस ओमिक्रॉनचा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा ठरणार नाही. यासोबतच या व्हायरसचा पुढील व्हेरिएन्ट जास्त वेगाने पसरणार असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. यावेळी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या,”ओमिक्रॉन हा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा असणार नाही. यापुढील व्हेरिएन्ट जास्त तंदुरुस्त असेल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, तो जास्त वेगाने पसरत जाईल कारण तो सध्या पसरत असलेल्या व्हेरिएन्टची जागा घेईल. मात्र हे आगामी व्हेरिएन्ट जास्त गंभीर असतील की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे.”
लसीकरण करणे आवश्यक आहे
डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की,”असे देखील होऊ शकेल की, भविष्यात जास्त इम्यून एस्केप पाहिले जाऊ शकेल. म्हणजेच, रोग प्रतिकारशक्तीच्या कोणत्याही उपायांचा विषाणूवर प्रभाव पडणार नाही आणि नवीन व्हेरिएन्टवरील लसीचा प्रभाव संपून जाईल.” गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी संस्थेने लसीकरणावर भर दिला. “आपण त्या परिस्थितीत राहू इच्छित नाही. म्हणून, आपण हे सुनिश्चित करू इच्छितो की, व्हायरसचा प्रसार कमी करू,” असेही केरखॉव्ह म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या कि, “आम्हाला अपेक्षा आहे की, योग्य हस्तक्षेपामुळे कोविड-19 चा प्रसार कमी होईल. मात्र त्यांच्यापैकीही, लसीपासून संरक्षित नसलेल्या किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांवर याचा जास्त परिणाम होईल.” कोरोनाव्हायरस श्वसनसंस्थेला लक्ष्य करत असल्याने जगाला संसर्ग वाढण्याचे मौसमी नमुने दिसू शकतात असा इशाराही त्यांनी दिला.