“महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखी”; भाजप नेत्याचे राऊतांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेत ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत’, असा इशारा भाजप नेत्यांना दिला. संजय राऊतांच्या या इशाऱ्याला भाजप आमदार अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते तथा आमदार अमित साटम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहार की, “नमस्कार मी आमदार अमित साटम. जनाब संजय राऊत मुंबई काही तुमची जागीर नाही. घरात घुसायची भाषा करता, पण तुमच्या घरात तुमची काय किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. महाविकास आघाडीत तुमची लायकी ही खलिता वाहणाऱ्या काशिदासारखीच आहे. भ्रष्टाचार करायचा, मग तो बाहेर काढणाऱ्या किरीट भाईंवरती भेकड हल्ले करायचे. प्रविण राऊत यांना अटक झाल्यानंतर तुमचं मानसिक संतुलन बिघडले आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्याच भाषेत बोलायचे तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या. हे या मराठ्याचे खुले आव्हान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय,” अशा शब्दात अमित साटम यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Comment